‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ : जनसामान्यांच्या उन्नयनासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या आणि स्वकर्तृत्वाने विचारांचा मानदंड उभा करणाऱ्या कर्तृत्ववान पुरुषांची काव्यमय शब्दचित्रे

इंद्रजित भालेराव यांच्या अंतर्मनात ठाण मांडलेल्या या व्यक्ती आहेत. त्यांच्याशी जुळलेले आंतरिक नाते आणि त्यांची लोककल्याणाची भूमिका या कवितांमधून प्रकट होताना दिसते. ‘भूमिनिष्ठा’ आणि ‘मांदियाळी’ हे दोन्ही शब्द विशिष्ट दृष्टीकोन व्यक्त करणारे आहेत. भूमिनिष्ठा हाच ज्यांच्या जगण्याचा ध्यास होता अथवा आहे आणि जे इथल्या सत्त्वशील परंपरेशी बांधील आहेत, अशीच शब्दचित्रे इथे अर्थपूर्ण पद्धतीने अभिव्यक्त झालेली आहे.......